अकोला (प्रतिनिधी- प्रज्ञानंद थोरात) अकोला येथील रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ एक नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला आहे. जिल्हा परिषद उर्दू शाळा ही जिल्हा महिला रुग्णालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. नवजात अर्भकाच्या मृतदेहाचे चार तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. शाळेच्या छतावर हा अर्भक कुठून आला? याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. खळबळजनक घटनेनं अकोल्यासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "जिल्हा परिषद शाळेल्या आवारात एक अर्भक आढळून आलं आहे आणि त्याच्या बाजूला मांसाचे तीन भाग आढळून आले आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील खुलासा होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शाळेच्या मैदानाजवळ काही मुलं क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता त्यांचा बॉल शाळेच्या छतावर गेला. काही मुलं बॉल आणण्यासाठी तिथे गेली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलं घाबरुन गेली आणि त्यांनी तिथे जवळच राहणाऱ्या काही लोकांशी संपर्क साधला. लोकांनी या धक्कादायक प्रकाराबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महत्त्वाची बाब म्हणजे, जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा परिषदेच्या शाळेपासून जवळच आहे. तसेच, सापडलेलं अर्भक स्त्री अर्भक आहे की, पुरूष अर्भक आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. असे वृत्त आमचे प्रतिनिधी प्रज्ञानंद थोरात यांनी वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांचेकडे कळवीले आहे .
अकोला:-नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कृषी नगर परीसारात युवकाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्या झालेला युवक हा जळगाव जामोद, तरोळा येथील रहिवसी असुन विशाल मधुकर झाडे वय वीस वर्षचा आहे. सदर मुलाची चाकूने भोसकून हत्या केली आहे. सिव्हिल लाईन पोलीस आणि SDPO घटना स्थळी दाखल होऊन मृतदेहावर पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.
पोटावर गंभीर चाकूचे घाव असलेल्या विशालला स्थानिक नागरिकांनी तातडीने अकोल्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या कृषी नगर संकुलात मिरज सिनेमासमोर एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता.त्यानंतर काही दिवसांनी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Akola Crime News : शहरात एका विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २६ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी नराधमाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील रहिवासी आरोपी रणजीत मावळे (३४) याचे एका विवाहितेसोबत प्रेम प्रकरण सुरू होते.
रणजीत हा सुद्धा विवाहित असून, तो विवाहितेला ब्लॅकमेल करीत होता. विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या दोघांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण विवाहितेच्या पतीला लागली. त्यामुळे त्यांचे बिंग फुटले. या प्रकरणी विवाहितेने खदान पोलीस ठाण्यात रणजीत मावळे याच्याविरुद्ध तक्रार दिली. खदान पोलिसांनी आरोपी रणजीत याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, २ (एन) ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन महिलांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास खदान पोलीस करीत आहेत.